खूशखबर, जुनी शनाया परत येतेय!

  • Latest News,Images,Videos & Music going Viral now - Viralcast.io

मुंबई, 29 आॅक्टोबर : 'माझ्या नवऱ्याची बायको' मालिका भले नंबर वनवर असेल, पण आजही जुन्या शनायाची आठवण सगळे जण काढतात. रसिका सुनील अमेरिकेला गेल्यामुळे तिनं या मालिकेचा निरोप घेतला खरा. पण तिच्या फॅन्ससाठी चांगली बातमी आहे. जुनी शनाया परत येतेय.

यावेळीही तिची अदा तीच आहे. काॅलेज कुमारीसारखं ती जगतेय. कारण ती परत येतेय ती काॅलेजमधूनच. रसिका सुनीलचा 'गॅटमॅट' सिनेमा येत्या 16 नोव्हेंबरला रिलीज होतोय. त्याचा ट्रेलर नुकताच रिलीज झालाय.

या सिनेमा अक्षय टंकसाळे, निखिल वैरागर, रसिका सुनील आणि पूर्णिमा डे हे कलाकार आहेत. काॅलेज तरुण-तरुणींचं प्रेम जुळवून देण्यासाठी दोन मित्र रंग्या आणि बगळ्या स्वत:ची एजन्सी सुरू करतात. मग सुरू होतात एकेक गमतीजमती. अगदी त्यांची रवानगी तुरुंगात होणयापर्यंतही घटना घडतात.

सिनेमाचं शीर्षक गीत अवधूत गुप्तेनं गायलंय. काॅलेजमधल्या गुलाबी प्रेमाचे रंग घेऊन हा सिनेमा येतोय. यात रसिका सुनीलची भूमिका एका श्रीमंत मुलीची आहे. शनायाच्या लोकप्रियतेचा फायदा या सिनेमाला होऊ शकतो.

काही दिवसांपूर्वी रसिकानं मालिकेचा निरोप घेतला होता. रसिका म्हणजे पहिली शनाया नव्या शनायाची -ईशाची पक्की मैत्रीण आहे. ती अमेरिकेला जाणार म्हणून ईशाला वाईटही वाटत होतं. आणि रसिकाही ही भूमिका सोडताना संवेदनशील बनली होती. ती ईशाला म्हणाली, 'टेक केअर आॅफ माय बेबी' आणि ईशा आता तेच करायला सज्ज झालीय.

'काॅफी विथ करण'मध्ये रणवीरनं उलगडलं त्याच्या फंकी पोशाखामागचं गुपित