डाॅ. मनमोहन सिंग यांचं मूल्यमापन करायला मी चुकलो – अनुपम खेर

  • Latest News,Images,Videos & Music going Viral now - Viralcast.io

मुंबई, 28 ऑक्टोबर : मनमोहन सिंग यांच्या राजकीय जीवनावर आधारीत ‘दि अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ चित्रपटाचं शूटिंग पूर्ण झालं आहे. सिनेमात मनमोहन यांची भूमिका अनुपन खेर साकारत आहेत. त्याचबरोबर अक्षय खन्ना, सुझेन बेरनर्ट, अहाना कुमरा, अर्जून माथूर हे चित्रपटात इतर भूमिकेत दिसणार आहेत. सिनेमाचं शूटिंग पूर्ण झाल्याची माहिती अनुपम खेर यांनी सोशल मीडियाद्वारे एक व्हिडिओ शेअर करत दिली.

चित्रपटात अनुपम खेर मनमोहन सिंग यांच्या भूमिकेत आहेत. अभिनय करताना मनमोहन सिंग यांच्यासारखाच आवाज येईल, हा प्रयत्न केलाय. खेर यांनीच हे व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करत, डॉ. सिंग यांचं मूल्यमापन करण्यात मी चुकलो, इतिहास तुमचं मूल्यमापन चुकीचं करणार नाही, असे उद्गार खेर यांनी सोशल मीडियावर काढले.

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी 2004 ते 2014 या काळात देशासाठी केलेल्या राजकीय आणि आर्थिक कामाचं दर्शन सिनेमात आहे. चित्रपटाच दिग्दर्शन विजय गुट्टे यांनी केलं आहे. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.