बाहुबलीपेक्षा जास्त खर्चिक रजनीकांतचा '2.0'

  • Latest News,Images,Videos & Music going Viral now - Viralcast.io

मुंबई, 27 ऑक्टोबर: सूपरस्टार रजनीकांत आणि अक्षयकुमार यांचा ‘2.0’ सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाच्या टिजरमुळे रजनीकांत आणि अक्षयकुमारचा रोबो लूक समोर आला आहे. सिनेमा येण्या आधीच त्याची सर्वत्र चर्चा आहे. प्रेक्षक सिनेमाची वाट पाहत असताना आता चित्रपटाबद्दल एक नवी बातमी समोर आली आहे. 2.0 टीममधील सुत्राकडून या चित्रपटाच्या बजेटबद्दल खुलासा करण्यात आला आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार फिल्ममेकर शंकरच्या 2.0 सिनेमाचा एकूण बजेट 400 कोटी असणार आहे. कारण चित्रपटाचे सगळे VFX परत शूट करण्यात आले आहेत. अक्षय आणि रजनीकांतच्या धमाकेदार अंदाजला 3D मध्ये शूट करण्यात आलं आहे. रजनीकांत यांनी याधीही 3D सिनेमे केले आहेत. पण अक्षयकुमार पहिल्यांदा 3D सिनेमात दिसणार आहे. भारतातील आतापर्यंतच्या 3D सिनेमांपैकी 2.0 सर्वात महागडा चित्रपट असणार आहे. आधी सिनेमाचा एकूण बजेट 543 कोटी सांगितलं जात होतं, पण आता 400 कोटी बजेट असल्याची माहिती मिळाली आहे.

सिनेमात रजनीकांत, अक्षयसोबत एमी जॅक्सन सुधांशू पांडे, रीयाज खान आणि ऐश्वर्या राय बच्चन सुद्धा असणार आहे. सिनेमाचं संगीत ए आर रेहमान यांनी केलं आहे. वीएफएक्सचा पुरेपूर वापर बाहुबली चित्रपटात करण्यात आला होता. या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर कमाईचा इतिहास रचला आहे.

जगभरात गाजलेला बाहुबली चित्रपटाचं बजेट 185 कोटी आणि बाहुबली-2 सिनेमाच बजेट 250 एवढं होतंं. सिनेमानं जवळपास 1800 कोटींचा व्यवसाय केला होता. भारतात या चित्रपटा इतका महाग आणि एवढा कमाई केलेला दुसरा कोणताच सिनेमा नाही. शिवाय या चित्रपटात स्टार कास्टींग फार मोठी होती. त्या तुलनेत 2.0 मध्ये जास्त कलाकार नसून देखील सिनेमाच बजेट एवढं महाग असणार आहे. 29 नोव्हेंबरला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 2.0 चित्रपट बाहुबलीचा रेकॉर्ड मोडणार का असा प्रश्न समोर येतं आहे.

VIDEO: मुंबईच्या लोकलमध्ये आत्महत्येचा प्रयत्न, क्षणात संपलं असतं आयुष्य पण…