बॉलिवूडचं जन्मस्थान असलेला आरके स्टुडिओ आता गोदरेज प्रॉपर्टीजचा ?

  • Latest News,Images,Videos & Music going Viral now - Viralcast.io

मुंबई, 27 ऑक्टोबर : बॉलिवूडच्या अनेक अजरामर कलाकृतींचं जन्मस्थान असलेला चेंबूरच्या आरके स्टुडिओचा ताबा लवकरच नव्या मालकाकडे जाणार असल्याची माहिती आहे. कपूर घऱाण्याचा मालकी हक्क असलेला आरके स्टुडिओ आता गोदरेज प्रॉपर्टीजनं विकत घेतल्याची महत्त्वाची माहिती आहे.

दिवाळीनंतर यासंदर्भातील कागदपत्र रजिस्टर होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. आरके स्टुडिओचा मालकी हक्क संस्थापक राज कपूर यांचे तीन चिरंजीव ऋषी कपूर, रणधीर कपूर आणि राजीव कपूर यांच्याकडे आहे.

साधारण वर्षभरापूर्वी आरके स्टुडिओला लागलेल्या आगीनंतर स्टुडिओचा खर्च चालवणं कपूर घराणाल्या जमत नसल्याच्या चर्चा होतीच. त्यानंतर कपूर परिलतच गोदरेज प्रॉपर्टींजनं चेंबूरमधील ही जवळपास सव्वादोन एकर जागा सुमारे 175 कोटींना विकत घेतल्याची माहिती आहे. तर बॉलिवूडचा हा राजवाडा आता इतिहास जमा होईल अशी खंत सिने क्षेत्राचे अभ्यासक दिलीप ठाकूर यांनी व्यक्त केली आहे.

VIDEO: आठवणीतला आरके स्टुडिओ…

आरके स्टुडिओ, चंदेरी दुनियेतली ही सोनेरी आठवण.1947मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि 1948 मध्ये शोमॅन राज कपूर यांच्या स्वप्नाची पूर्तता झाली ती आरके स्टुडिओच्या रूपानं. भारतीय सिनेमाच्या सुवर्ण इतिहासातील ही दंतकथा.

गेली 7 दशकं आरके स्टुडिओनं चित्रपट सृष्टीतील अनेक पिढ्या पाहिल्या. मागील वर्षी सप्टेंबरमध्ये आरके स्टुडिओमधील काही भाग आगीने जळून खाक झाला.

आरके स्टुडिओ आता विकण्यात येणार आहे. हा पांढरा हत्ती पाळणं आता शक्य नाही, त्यामुळे स्टुडिओ विकणं योग्य ठरेल असं ऋषी कपूर यांनी सांगितलं. आरके स्टुडिओ आता राहणार नाही पण राहतील या सुवर्णकाळाच्या कधीही न भंगणाऱ्या सोनेरी आठवणी.

=========================================================================