राहुल देशपांडेच्या 'अमलताश' सिनेमाला मामि फेस्टिवलमध्ये चांगला प्रतिसाद

  • Latest News,Images,Videos & Music going Viral now - Viralcast.io

मुंबई, 29 आॅक्टोबर : गायक राहुल देशपांडे यांची गायकी त्याचे आजोबा ज्येष्ठ गायक वसंतराव देशपांडे यांची आठवण करून देते. नेहमीच राहुलची गाण्यांची मैफल रंगत असते. पण आता तो आपल्याला वेगळ्या रूपात दिसणार आहे.

हा त्याच्या गाण्यासाठी ओळखला जात असला तरीही लवकरच तो मराठी सिनेमात पदार्पण करतोय. त्याची मुख्य भूमिका असलेला अमलताश हा सिनेमा सध्या प्रचंड चर्चेत आहे. या सिनेमात राहुल आणि त्याची सख्खी बहीण दीप्ती माटे या दोघांनी भूमिका केल्यात. याशिवाय सिनेमात राहुलची खास गाणीही आहेत.

पुष्पक विमान या सिनेमात पाहुण्या कलाकाराची भूमिका केल्यानंतर राहुल संपूर्ण भूमिकेत दिसणार असल्याने त्याच्या चाहत्यांना फार उत्सुकता आहे.त्यात त्याची बहीण दीप्ती माटेही आहे.नुकताच या सिनेमाचा खास शो मामि फिल्म फेस्टिव्हलमध्ये पार पडला. या सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळालाय.

अमलताश सिनेमा एका कलाकाराच्या आयुष्याभोवती फिरतो. संगीतप्रेमी कलाकाराच्या आयुष्यातले चढउतार सिनेमा दाखवतो. सुहास देसले यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलंय. भूषण माटेनं संगीत दिलंय.

पुष्पकविमान आणि बालगंधर्व सिनेमात राहुल देशपांडेची छोटी भूमिका होती. राहुलनं मध्यंतरी म्युझिकल ब्लाॅगही सुरू केला. राहुलचा कानडा राजा पंढरीचा हे गाणं खास ठरलंय. अनेक कार्यक्रमांत या गाण्यालाच मागणी असते.राहुलचं गाणं ऐकणं हे संगीतप्रेमींसाठी अनोखी ट्रीट असते.

राहुलचे आजोबा वसंतराव देशपांडेंनीही संगीत नाटकाबरोबर काही मोजके सिनेमे केले होते. त्यातला अष्टविनायक विशेष गाजला होता.

Photos : बोल्ड करिना, ब्युटिफुल आलिया,लावण्यवतींचा जलवा