लंडन-मुंबई-नागपूर आणि परत लंडन, सिनेमा-नाटकासाठी पुष्कर श्रोत्रीची धावपळ

  • Latest News,Images,Videos & Music going Viral now - Viralcast.io

मुंबई, 29 आॅक्टोबर : कलाकार आपल्याला सिनेमे, नाटकं, मालिका करताना दिसतात. त्यांची अफाट लोकप्रियता पाहून सर्वसामान्य फॅन्स बरंय बाबा असा सूरही काढत असतात. कलाकारांच्या या आयुष्याचा हेवाही वाटतो काहींना. पण अनेकदा त्यामागे अपार कष्ट असतात. अभिनेता पुष्कर श्रोत्रीनं असाच एक अनुभव न्यूज18लोकमतच्या वेबसाइटशी बोलताना शेअर केलाय.

आॅक्टोबरमधलीच दोन दिवसातली ही घटना. पुष्कर लंडनला एका मराठी सिनेमाचं शूटिंग करतोय. या शूटिंगच्या डेट्स ठरण्याआधीच पुष्करचं नागपूरला नवरात्रीत नाटक ठरलं होतं. 'हसवा फसवी'चा प्रयोग होता. पुष्कर सांगतो, ' मी दोन दिवसात लंडनहून मुंबईला आलो, मुंबईहून नागपूरला गेलो. तिथे प्रयोग केला. त्यानंतर पुन्हा नागपूरहून विमानानं मुंबईला आलो. आणि मग इथे लंडनची फ्लाइट पकडली.'

नुसतं हे ऐकलं तरी दमायला होतं. पण पुष्करची एनर्जी कायम राहिली. शिवाय लंडन ते मुंबई जवळजवळ साडेनऊ तासाचा प्रवास. त्यानंतर नागपूरला जाऊन प्रयोगाला उभं राहणं. शिवाय हसवा फसवीमध्ये पुष्करच्या सहा भूमिका आहेत. 'कनेक्टिंग फ्लाइट उशिरा असेल तर…असं टेंशन होतं. पण एअर इंडियाची कृपा झाली.' पुष्कर सांगतो.

पुष्कर सांगतो, ' मी निघालो तेव्हा लंडनचं तापमान 4 ते 5 डिगरी सेल्सियस होतं. नागपूरचं 37 डिगरी सेल्सियस आणि मी परत लंडनला गेलो तेव्हा पुन्हा 4 ते 5 सेल्सियस होतं.' हे सगळं तो करू शकला कारण तो रोज सूर्यनमस्कार घालतो. त्यांच्या या फिटनेसमागे हे रहस्य आहे.

पुष्कर श्रोत्रीनं 20 दिवस लंडनला सिनेमाचं शूट केलं. या मराठी सिनेमाबद्दल त्यानं मोजक्याच गोष्टी सांगितल्या. या सिनेमात तो खलनायकाची भूमिका करतोय. त्याच्याबरोबर प्रसाद ओक, आनंद इंगळेही आहेत.

कलाकारांना मिळणारा पैसा, प्रसिद्धी नेहमीच दिसत असते, पण त्यामागचे त्यांचे हे कष्टही खूप असतात.

'काॅफी विथ करण'मध्ये रणवीरनं उलगडलं त्याच्या फंकी पोशाखामागचं गुपित