92व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अरुणा ढेरेंची निवड

  • Latest News,Images,Videos & Music going Viral now - Viralcast.io

मुंबई, 28 आॅक्टोबर : येत्या 11 ते 13 जानेवारी दरम्यान यवतमाळ इथे होणाऱ्या 92व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कवयित्री, समीक्षक डॉ. अरुणा ढेरे यांची निवड करण्यात आली. त्या आजपर्यंतच्या इतिहासातील 5 व्या महिला अध्यक्ष आहेत. अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या घटना दुरुस्ती नंतरची निवडणूक टाळून झालेली ही निवड पहिलीच आहे.

यवतमाळमध्ये आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार असून यंदा पहिल्यांदाच निवडणूक न होता बिनविरोध अध्यक्ष निवडला जाणार होता. यासाठी ना. धों महानोर, प्रभा गणोरकर आणि अरुणा ढेरे यांची नावं आघाडीवर होती. निवडणूक न होता बिनविरोध अध्यक्ष निवडला जाणार अशी साहित्य महामंडळाने घटना दुरुस्ती केली असून त्याचीच अंमलबजावणी यवतमाळ संमेलनापासून झालीय.

साहित्य संस्था,संलग्न संस्था यांनी सुचवलेली 3 नावं आणि विद्यमान संमेलनाध्यक्ष यांनी सुचवलेलं एक नाव अशा 20प्रतिनिधींनी सुचवलेल्या 19 नावांतून अध्यक्षाची निवड झाली. मराठवाडा साहित्य परिषदेने सुचवलेली 3 नावं मागे घेतली आहेत. या तीन नावांशिवाय भालचंद्र नेमाडे, किशोर सानप यांचीही नावे चर्चेत होती.

17 वर्षांनी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी महिला आल्यात. याआधी कुसुमावती देशपांडे, दुर्गा भागवत, शांता शेळके, विजया राजाध्यक्ष या चारच साहित्यिका संमेलनाध्यक्षपद भुषवू शकल्या आहेत.

याआधीच्या महिला संमेलनाध्यक्ष

1. कुसुमावती देशपांडे, 1961, ग्वाल्हेर

2. दुर्गा भागवत, 1975, कराड

3. शांता शेळके, 1996, आळंदी

4. डॉ. विजया राजाध्यक्ष, 2001, इंदूर

महिलांना भारतीय पोशाखाचं महत्त्व सांगण्यासाठी दीपिकानं उचललं हे पाऊल