टीम इंडियाची लॉटरी, पगार वाढणार दुप्पटीने ; विराटचा पगार 10 कोटींच्या घरात ?

  • Latest News,Images,Videos & Music going Viral now - Viralcast.io

15 डिसेंबर : भारतीय क्रिकेटपटूंसाठी येणारं वर्ष लाभदायक असणार आहे. बीसीसीआय क्रिकेटपटूंच्या मानधनात 100 टक्के वाढ करणार आहे. म्हणजेच काय तर जितके पैस क्रिकेटपटूंना आता बोर्डाकडून मिळतात त्यापेक्षा दुपट्ट मानधन त्यांना आता मिळू शकतं, अशी माहिती सूत्रांनी दिलीये.

सर्वोच्च न्यायालयानं तयार केलेल्या प्रशासकीय समिती क्रिकेटपटूंच्या मानधन वाढीच्या फॉर्म्युल्यावर काम करतेय आणि लवकरच हा नवा प्रस्ताव बीसीसीआयला सादर करण्यात येणार आहे.

सध्या बीसीसीआयच्या वार्षिक उत्पन्नाच्या 26 टक्के रक्कमही ही मानधनावर खर्च करण्यात येते. त्यामध्ये 13 टक्के रक्कम ही आंतरराष्ट्रीय खेळाडूंसाठी, 10.6 टक्के रणजीपट्टूंसाठी आणि उर्वरीत रक्कम ही महिला खेळाडू आणि ज्युनिअर खेळाडूंच्या मानधनावर खर्च होते. पण आता यामध्ये मोठे बदल होणार आहे. बोर्डच्या वतीने, खेळाडूंच्या देयासाठी 180 कोटी रुपयांचा निधी आहे. यात सीओएनं 200 कोटी रुपयांचा निधी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या मानधनात दुप्पटीनं वाढ होणार आहे. 2017मध्ये 46 सामन्यांसाठी कोहलीला 5.51 कोटी रुपये मिळायचे. पण आता प्रशासकीय समितीचा प्रस्ताव मान्य झाला तर पुढच्या वर्षी 46 सामन्यांसाठीच कोहलीला 10 कोटी रुपये मिळतील. त्यामुळे विराटची पगार वाढीची मागणी पूर्ण झाली असंच म्हणायला लागेल.