दिल्लीच्या कसोटीवर प्रदूषणाचे ढग; मैदानावर मास्क लावून आले श्रीलंकन खेळाडू

  • Latest News,Images,Videos & Music going Viral now - Viralcast.io

दिल्ली, 03 डिसेंबर: दिल्लीमधील प्रदूषण श्रीलंकेच्या मदतीला धावून आलं. दिल्ली टेस्टच्या दुसऱ्या दिवशी श्रीलंकेनं प्रदूषणामुळे खेळ थांबवण्याची मागणी केली. एवढचं नाही तर लंकेचे खेळाडू मास्क लावून मैदानात उतरले. त्यामुळे पुन्हा एकदा दिल्ली प्रदूषणाचा विषय ऐरणीवर आला आहे.

श्रीलंकन खेळाडू दिल्लीत मास्क लावून मैदानात उतरले. सुरुवातीला प्रदूषणाचा त्रास होत असल्याचा देखावा त्यांनी केला आणि मग लंकेच्या कॅप्टननी कांगावा करत चक्क खेळ थांबवण्याचीच मागणी केली. अर्थात विराटनं त्याला विरोध केला. पण खेळ थांबवायचा की सुरु ठेवायच्या या चर्चेत तब्बल 16 मिनिटं वाया गेली. फिरोज शहा कोटलावर दाटलेलं धुकं, वाढलेल्या प्रदूषणाची साक्ष देत होतं. पण खेळ थांबवण्याइतकी स्थिती वाईट होती का? की श्रीलंका स्थितीचा फायदा घेत होते हा प्रश्नच आहे.

खेळामधल्या व्यत्ययाचा लंकेला फायदा झाला. खेळ सुरु झाल्या झाल्या अश्विन बाद झाला. आणि त्यानंतर फॉर्ममध्ये असलेला विराटही 243 रन्सवर आऊट झाला. दरम्यान लंकेचा एक-एक खेळाडू प्रदूषणाचा त्रास होत असल्यामुळे मैदान सोडत होता. लंकेच्या कॅप्टननं पुन्हा एकदा खेळ थांबवण्याची मागणी केली. आणि त्यानंतर लगेचचं विराटनं भारताचा डाव 536 रन्सवर घोषित केला. विराटच्या निर्णयानंतर लंकेचे खेळाडू त्याचं हसू लपवू शकले नाही.

प्रदूषणामुळे क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच खेळ थांबला. पहिल्यांदाच क्रिकेटपटू मास्क लावून मैदानात उतरले. प्रदूषणामुळे तब्बल सोळा मिनीटं खेळ थांबला. लंकेच्या काही खेळाडूंनी त्रास झाल्यामुळे मैदान सोडलं. दिल्ली कसोटीत आणखी 3 दिवसांचा खेळ बाकी आहे. त्यामुळे प्रदूषणामुळे सामना रद्द झाला. तर आंतरराष्ट्रीय पातळीवरभारतासाठी मोठी नामुष्की ठरेलं.