द्विशतक अन् वेडिंग रिंगला किस..,रोहितचे रितिकाला अॅनिव्हर्सरी गिफ्ट !

  • Latest News,Images,Videos & Music going Viral now - Viralcast.io

13 डिसेंबर : भारताचा धडाकेबाज फलंदाज रोहित शर्माने आज भीमपराक्रम गाजवत तिसरे द्विशतक झळकावले. पण, आजचे हे शतक खास होते. कारण आज रोहित शर्माच्या लग्नाचा वाढदिवस आहे. द्विशतक झळकावल्यानंतर रोहितने हातातल्या वेडिंग रिंगला किस करून आपल्या पत्नीला वेडिंग गिफ्ट दिले.

मोहालीमध्ये श्रीलंकेने याही सामन्यात टाॅस जिंकून पहिले गोलंदाजीचा निर्णय घेतला. टीम इंडिया मैदानात उतरली ती रोहित शर्माच्या वादळानेच…रोहित शर्माने सुरुवातीपासूनच लंकेच्या गोलंदाजी धुलाई करण्यास सुरुवात केली. 153 चेंडूचा सामना करत त्याने 208 नाबाद खेळी केली. यात त्याने 13 चौकार आणि 12 षटकार लगावले.

रोहितची ही खेळी पाहण्यासाठी पत्नी रितीका खुद्द स्टेडियममध्ये हजर होती. रोहितच्या या धडाकेबाज इनिंगकडे ती डोळे लावून होती. 'क्रास फिंगर' करून रोहितच्या शतकाची रितिका वाट पाहत होती. रोहितने जसे द्विशतक केले आणि हातातल्या रिंगला किस केलं तेव्हा रितिकाच्या डोळ्यात अश्रू तरळले. आज लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी रोहितने आपल्या पत्नी रितिकाला आपल्या कारकिर्दीतली अनोखी भेट दिली.

रोहितने याआधी 14 नोव्हेंबर 2014 ला श्रीलंकेच्या विरुद्ध 264 धावा केल्या होत्या. तर 2 नोव्हेंबर 2013 ला आॅस्ट्रेलियाविरुद्ध 209 धावा केल्या होत्या. आज पुन्हा लंकेविरुद्ध 208 धावा करून रोहितने कारकिर्दीतले द्विशतक पूर्ण केले.