रो'हीट'चा पराक्रम, झळकावले तिसरे द्विशतक

  • Latest News,Images,Videos & Music going Viral now - Viralcast.io

13 डिसेंबर : भारताचा तडाखेबाज फलंदाज रोहित शर्माने आज आणखी एक हिट खेळी करत दुहेरी शतक झळकावले आहे. रोहित शर्माचे हे कारकिर्दीतले तिसरे द्विशतक आहे. रोहितच्या या पराक्रमाच्या बळावर भारताने श्रीलंकेसमोर 393 धावांचा डोंगर उभारलाय.

पहिल्या एकदिवशीय सामन्यात लाजिरवाण्या पराभवानंतर आज मोहालीमध्ये टीम इंडियाने श्रीलंकेचा गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. कर्णधार रोहित शर्माने नाबाद 208 धावांची शानदार खेळी केली. रोहितने 13 चौकार आणि तब्बल 12 षटकारांची आतषबाजी करत द्विशतक झळकावले. तर शिखऱ धवनने 67 चेंडूत 68 धावा केल्यात. तर श्रेयस अय्यरने चमकदार कामगिरी करत 88 धावा केल्यात. यात 9 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश आहे. भारताने निर्धारीत 50 षटकात 392 धावांचा डोंगर उभा केलाय. विशेष म्हणजे आज रोहित शर्माच्या लग्नाचा वाढदिवस आहे. लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याने द्विशतक झळकावून अॅनिव्हर्सरी गिफ्ट दिलंय.